Main Featured

पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट


पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. दोन्ही जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दर्शवला आहे. शिवाय मुंबई, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागानं 24 तासांत कमीतकमी 204.5 मिमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, कोल्हापूर, सतारा आणि सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील सोमवारपासून मुसळधार पावासाचा अंदाज आहे. तसेच उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात बुधवारपर्यंत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Must Read 
1) धोनीच्या जिवलग मित्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?
2) नागपुरात पहिल्यांदाच आढळला दुर्मिळ फॉस्टेन कॅट साप
3) 'या' समस्या असल्यास हळदीचं दूध पिऊ नका
4) करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, मानाच्या गणेश मंडळांचा मोठा निर्णय
5) मॉरिशसच्या पर्यावरणीय संकटात भारताने घेतला पुढाकार; अशी केली मदत, पाहा PHOTOS

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील पावसाचा मुक्काम लांबणार असून या दोन विभागासह राज्यात इतरत्र 22 ऑगस्टपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. राज्यातील पाऊस आता सरासरीच्या पुढे गेला आहे.