raksha bandhan 2020 gift ideas

आजकाल बहिणींना रक्षाबंधनाला ओवाळणी (raksha bandhan 2020) म्हणून ‘पाकीट’ चालत नाही. त्यांना ‘गिफ्ट’ द्यावं लागतं. पुन्हा ते ‘सरप्राइझ’ असावं अशी बहिणींची ‘माफक’ अपेक्षा असते. हे असं गुपचूप खरेदी करून, सुंदर कागदात गुंडाळून देणं वगैरे नाजूक उद्योग भावाला कुठले जमायला? 
गिफ्ट घ्यायची म्हणजे नेमकं काय यापासून सुरुवात. त्यातून ते गिफ्ट बहिणीला आवडेल याची शाश्वती नाही. म्हणूनच या गिफ्टबंधनात समस्त बंधूवर्गाची गोची होते. जाणून घेऊयात अशी काही गिफ्ट… हे गिफ्ट पाहिल्यावर बहिणीच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद दिसेल.

Raksha bandhan 2020 Ideas

ड्रेस आणि ज्वेलरी –
सोमवार, ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला तुमच्या प्रिय बहिणीला ट्रेंडी ज्वेलरी द्या. किंवा एखादा छानसा डिजायनर ड्रेस गिफ्ट करा. तिला हे रक्षाबंधन कायम स्मरणात राहिल.


मोबाईल फोन – रक्षाबंधनाला स्मार्टफोन किंवा छानसं गॅझेटही गिफ्टसाठी चांगला पर्याय असू शकतो. तुमची बहीण गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडे मोबाईलचा हट्ट करत असेल तर रक्षाबंधनाचा योगायोग सााधून एखादा चांगला मोबाईल भेट द्या. तुम्ही ऑनलाईन स्मार्ट फोन मागवू शकता. सध्या मोबाईल फोनवर ऑनलाईन चांगल्या ऑफर आहेत.
घड्याळ – या रक्षाबंधनाला एखादे स्टाईलिश घड्याळ भेट द्या. हे घड्याळ भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही कपड्यावर मॅच व्हावे ही काळजी घ्या.
फोटो फ्रेम – फोटो ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमचा आठवणी साठवलेल्या असतात. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी फोटो मदतगार ठरत असतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बहिणीचा एखादा जुना फोटो असेल जो घरच्या जुन्या फाटक्या अल्बममध्ये धूळ खात पडला असेल त्याला काढून त्याची एक फ्रेम करूनही तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता. खूप जास्त पैसे न खर्च करता नेहमीसाठी तिच्या आठवणीत राहिल असं हे गिफ्ट ठरू शकतं.
पुस्तक – बाजारातील इतर महागड्य़ा वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा तुमच्या बहिणीला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकेही गिफ्ट देऊ शकता.
म्युझिक बॉक्स- तुमच्या बहिणीला जर संगीत ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीच्या संगीताचा म्युझिक बॉक्स गिफ्ट करू शकता