काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेतलीय. त्यामुळे, राजस्थानात काँग्रेससमोरचा पेच सुटल्याची चिन्हं दिसत आहेत. या भेटीदरम्यान सचिन पायलट यांची गांधी कुटुंबीयांशी झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचं समजतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्ष सचिन पायलट टीमच्या संपर्कात होते. त्यामुळेच सचिन - राहुल यांची ही भेट (Sachin-Rahul meeting) शक्य झाली. या भेटीत प्रियांका गांधींनीही महत्त्वाची भूमिका निभावल्याचं समजतंय. त्यांनी याआधीही सचिन यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू होत्या.

सचिन पायलट काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांच्या संपर्कात होते. त्यांच्याच मार्फत त्यांनी गांधी कुटुंबीयांशी संपर्क साधला. राजस्थानात १४ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशनाला सुरुवात होतेय. त्यापूर्वी हे संकेत काँग्रेससाठी चांगले मानले जात आहेत.
राजस्थानात गेल्या महिन्याभराहून अधिक वेळेपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. पायलट हे राहुल गांधींच्या जवळच्या नेत्यांपैंकी एक मानले जातात. राहुल यांच्याशी (Sachin-Rahul meeting) नजिकचे संबंध मानले जाणारे राजीव सातव सतत सचिन पायलट यांच्या संपर्कात असल्याचीही माहिती मिळतेय.

MUST READ


दुसरीकडे, गेहलोत सरकार पाडण्याच्या आरोपानंतर आता भारतीच जनता पक्षही उघडउघड मैदानात उतरलाय. आत्तापर्यंत हे काँग्रेस पक्षातील वाद असल्याचं सांगणाऱ्या भाजपनं आता मात्र आपली रणनीती बदललीय. काँग्रेसच्या आमदारांच्या खरेदीच्या आरोपांनंतर आता भाजपनं आपल्या आमदारांना (Sachin-Rahul meeting) गुजरातच्या बाडाबंदीमध्ये हलवलंय. भाजपकडे एकूण ७५ आमदार आहेत. यात ३ आरएलपीचे आमदारही आहेत.