Main Featured

भाजप उद्या आणणार अविश्वास प्रस्ताव; गहलोत सरकारच्या अडचणी वाढल्या


भाजप आणणार अविश्वास प्रस्ताव


राजस्थानात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला असून उद्या शुक्रवार पासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. महत्वाचे म्हणजे उद्याच सभागृहात गहलोत सरकारविरोधात अविश्वास(Government problems increase) प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने(Bharatiya Janata Party) केली आहे. ही माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेता आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी दिली. हे पाहता राजस्थानातील गहलोत सरकारसमोर आता बहुमत सिद्ध करून दाखवण्याच मोठे अव्हान उभे ठाकले आहे.


गहलोत सरकार लवकरच कोसळणार- भाजप
काँग्रेस पक्ष आपल्या घरात टाके लावून कपडे जोडू पाहत आहे. मात्र कपडा फाटून गेला आहे. हे सरकार लवकरच कोसळणार आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते गुलाबचंद कटारिया यांनी म्हटले आहे. हे सरकार आपल्याच अंतर्विरोधामुळे पडणार असून काँग्रेस उगाचच भारतीय जनता पक्षावर आरोप करत आहे, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील घरातील(Government problems increase) भांडणाशी भारतीय जनता पक्षाचे काहीएक देणे-घेणे नसल्याचेही ते म्हणाले.

काल गुरुवारी भारतीय जनता पक्षाने जयपूरमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या देखील सहभागी झाल्या होत्या. तसेच बैठकीत केंद्रीय नेतृत्वाकडून आलेले प्रतिनिधी देखील उपस्थित होते.
Must Read

राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी आदेश दिल्यानंतर आता उद्या १४ ऑगस्टपासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य सरकारकडून करोनाचे संकट, लॉकडाउन आणि इतर (Government problems increase)मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अशामध्ये जर भारतीय जनता पक्षाने या चर्चेंनंतर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यास गहलोत सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणआर आहे.