बाइक नाही दिली म्हणून रागात 100 फूट उंच विजेच्या खांबावरून मारली उडी, थरारक LIVE VIDEOछत्तीसगडची राजधानी रायपूर येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत असे काही केले, त्यामुळे अख्खं शहर हादरलं. या 16 वर्षीय मुलगा दारूच्या नशेत हायपरटेंशन वायरवर चढला, याचे कारण होते कुटुंबानं त्याला बाईक देण्यासाठी दिलेला नकार. विद्युत तारांमुळे या मुलाला जोरदार झटका लागला. यामुळे तो तब्बल 100 फूट अंतरावरून खाली पडला. या तरुणाला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या युवकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. ही बाब राजधानीच्या गुडियारी येथे, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ही घटना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता घडली. एक 16 वर्षीय मुलगा नशेत वीजेच्या खांबावर चढून कुटुंबाला धमकी देत होता. यावेळी जमलेल्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. लोकांनी पोलिसांनाही माहिती दिली. कुटुंबीयांसह पोलिसांनीही त्या युवकास समजावून सांगितले, मात्र त्याने रागात 100 फूटांवरून खाली उडी मारली. यात तो जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.हायपरटेंशन व्हायरमुळे हा मुलीला जोरदार करंट लागला. त्यामुळे तो थेट 100 फूटांवरून खाली पडला. हा तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. त्याला बाईक हवी होती, मात्र घरच्यांनी बाईक घेऊन देण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलानं रागात दारू पिण्यास सुरुवात केली, आणि वीजेच्या खांबावर चढला. मात्र एका बाइकमुळे या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.