Main Featured

जिल्ह्यात पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी एक फुटाने कमी


Rain showers in the district | जिल्ह्यात पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी एक फुटाने कमी


 जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे.

सकाळपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत मात्र भुरभुरच राहिली. धरणक्षेत्रात पाऊस चांगल्या प्रकारे सुरू असून सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील कमी असून राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे.
वारणा धरण ८८ टक्के भरल्याने त्यातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यातून प्रतिसेकंद ८३०१ घनफूट विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरण ९० टक्के भरले असून, त्यातून १८००, तर कासारी धरणातून १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी संथगतीने कमी होत आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १८.४९ मिलिमीटर पाऊस झाला. पंचगंगेची पातळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २८.४ फुटांपर्यंत होती. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असून दोन राज्य व दोन प्रमुख जिल्हामार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील सहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन दोन लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.

धरणांतील पाणीसाठा, टीएमसीमध्ये -

राधानगरी (८.२८), तुळशी (३०.०६), वारणा (३०.१२), दूधगंगा (२२.७९), कासारी (२.२३), कडवी ( २.४४), कुंभी (२.२४), पाटगाव (३.५३).