Main Featured

तर या लसीमुळे दोन वर्ष लोकं राहणार कोरोनामुक्त', असा दावा करणाऱ्या रशियाच्या डॉक्टरांचा राजीनामा


Russia vaccine Sputnik-V : '...तर या लसीमुळे दोन वर्ष लोकं राहणार कोरोनामुक्त', असा दावा करणाऱ्या रशियाच्या डॉक्टरांचा राजीनामा रशियाने (Russia vaccine sputnik-v) जगातील पहिली कोरोनाव्हायरस लस (Coronavirus Vaccine) तयार करण्याची घोषणा केली असली तरी या लशीबाबत अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. दुसरीकडे या लसीबाबत विविध दावे केले जात आहेत. दरम्यान, या लशीबाबत रशियानं आता नवा दावा केला आहे. रशियाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक अलेक्झांडर (Professor Alexander Chucalin )यांनी म्हटले आहे की sputnik-v लशीचा एक डोस दोन वर्ष कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरेल.
गिन्टेसबर्ग यांनी रशियाच्या सरकारी टीव्ही वाहिनीवरील मुलाखतीत हे सांगितले. ते म्हणाले की ही लस तयार करण्यासाठी संशोधन केंद्राला पाच महिने लागले. रशियन सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की या क्षणी ही लस फक्त फ्रंटलाइन कर्मचारी आणि इतर गरजू लोकांना देण्यात येणार आहे. मात्र या लसीच्या नोंदणी दरम्यान रशियन सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांवरून (Covid-19 Vaccine) या लशीच्या सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला. कागदपत्रांमधून प्राप्त झालेल्या सर्वात महत्वाच्या माहितीनुसार, ही लस किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी क्लिनिकल टेस्ट पूर्ण झालीच नाही.अलेक्झांडर यांनी दिला राजीनामाजागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लस sputnik-v बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर अलेक्झांडर यांनी राजीनामा दिला आहे. डॉक्टर अलेक्झांडर यांनी असे म्हटले आहे, की लस बनविण्यामध्ये वैद्यकीय शास्त्रांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. डॉक्टर अलेक्झांडर हे रशियामधील सर्वोच्च डॉक्टरांपैकी एक मानले जातात.लस बनवण्यासाठी घाई केल्याचा त्यांचा आरोप आहे. ते म्हणाले की sputnik-v लशीसाठी आवश्यक मंजूरी घेतली गेली नव्हती आणि घाईघाईने त्याची घोषणा केली गेली. अलेक्झांडरने स्पष्टपणे सांगितले आहे की ही लस सुरक्षित राहील याची शाश्वती नाही.
रशियाने वैज्ञानिक डेटा दिला नाहीरशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वतः कबूल केले आहे की जेव्हा त्यांच्या मुलीने लसीचा डोस दिला तेव्हा तिलाही ताप आला होता पण ती लवकरच बरी झाली. पुतीन यांनी असा दावा केला की माझ्या मुलीच्या शरीरात अॅंटिबॉडीज वाढले आहेत. मात्रहा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. रशियाने अद्याप या लसीच्या सर्व चाचण्यांशी संबंधित वैज्ञानिक डेटाही सादर केलेला नाही. तिसऱ्य टप्प्यात ट्रायल केला की नाही याबद्दलही शंका आहे.