Main Featured

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनकPranab Mukharjee

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukharjee) यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती गंभीर असून ते अजुनही व्हेंटिलेटरवरच आहेत अशी माहिती हॉस्पिटलच्या सूत्रांनी दिली. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूमध्ये गाठ झालेली आहे आणि त्यांची कोविड चाचणी (corona positive) सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने गुंतागुंत वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

Must Read84 वर्षांच्या मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांची खास टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र कोविड आणि मेंदूच्या गाठीमुळे डॉक्टरांची काळजी वाढली आहे. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी (Pranab Mukharjee) यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोविड  चाचणी (corona positive) करण्याच आवाहन केलं होतं.
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतरही अनेक केंद्रीय मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याच पुढे आलं आहे.