Prakash Ambedkar Bahujan Aghadi Warns of Protesting if Govt fails to Reopen Temples in Maharashtra Immediately


वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी  (Prakash Ambedkar) मंदिर प्रवेशावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी 31 ऑगस्टला पंढरपूर येथे होणाऱ्या मंदिर प्रवेश आंदोलनाला आपल्या(Demand by Prakash Ambedkar) पक्षाचा पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनात स्वत: सहभागी होणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. आंबेडकरांनी पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि मठांच्या प्रमुखांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.


मंदिर प्रवेश आंदोलनातून हिंदूंच्या नव्या राजकीय धृवीकरणाचे प्रयत्न

कोरोनाच्या प्रकोपापासून राज्यातील सर्वच मंदिरं भाविकांसाठी बंद आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या आस्थेचा विषय असणारी पंढरपूरची वारीही यावर्षी प्रतिकात्मक रूपातच आटोपावी लागली. ऑगस्ट महिन्यात आंबेडकरांनी राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला (Demand by Prakash Ambedkar)आहे. येत्या 31 ऑगस्टला पंढरपुरला 'विश्व युवा वारकरी सेने'चं मंदिर प्रवेशासाठी आंदोलन आहे. या आंदोलनात स्वत: प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. या दिवशी एक लाख वारकऱ्यांसोबत पंढरीतील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.
Must Read

वारकरी संत आणि पंढरपुरातील मठाधिशांना आंदोलनात सहभागी होण्याचं साकडं

पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील संत आणि विविध मठांच्या प्रमुखांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन प्रकाश (Demand by Prakash Ambedkar)आंबेडकरांनी केलं आहे. या आंदोलनात हे घटक सहभागी झाले तर आंदोलनाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी या सर्वांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.