Main Featured

पोलीस उपनिरीक्षकाचं गाडीवरून सुटलं नियंत्रण, पुढे घडला धक्कादायक प्रकार


पोलीस उपनिरीक्षकाचं गाडीवरून सुटलं नियंत्रण, पुढे घडला धक्कादायक प्रकारपंढरपूरमध्येभीषण अपघातामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र क्षिरसागर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर राजेंद्र यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलातही शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-कोर्टी रोडवर संट्रो गाडीतून येत असताना त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी पलटी झाली. यामध्ये गाडीखाली दबल्यामुळे राजेंद्र यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.राजेंद्र क्षिरसागर हे काही दिवसांपासून सुट्टी वर होते. काल संध्याकाळी काही निमित्ताने ते कोर्टी येथे गेले होते.आज पहाटे संट्रो गाडीतून येत असताना गाडीवरील ताबा सुटला व गाडी जागीच पलटी मारल्याने ते गंभीर जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला. मुळचे लातुर जिल्ह्यातील असणारे राजेंद्र क्षिरसागर नेमक्या कोणत्या कारणासाठी कोर्टी भागात गेले होते ? सुट्टीवर असताना ऐवढ्या पहाटे घाईघाईने गाडीने पंढरपुरकडे निघाले होते हे स्पष्ट झाले नाही. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी राजेंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर पोलीस सध्या अपघाताचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.