Main Featured

BREAKING : अजित पवार, धनंजय मुंडेंना पोलिसांची नोटीस, न्यायालयात हजर राहावं लागणार

BREAKING : अजित पवार, धनंजय मुंडेंना पोलिसांची नोटीस, न्यायालयात हजर राहावं लागणार

 राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच पोलिसांनी नोटीस बजावली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे, कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे, शिवसेनेचे मुंबईतील नेते सचिन अहिर यांच्यासह 11 जणांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी 2018 मध्ये पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या (Charges filed against him for violating curfew order)सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. सदर प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

Must Read

अजित पवार आणि अन्य नेत्यांविरोधातील दोषारोपपत्राची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, (Charges filed against him for violating curfew order)सध्याच्या सरकारमधील वजनदार नेत्यांनाच पोलिसांची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्कालीन सरकारविरोधातच आंदोलन केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असली तरीही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे.