Main Featured

'तुझी चोरांची टोळी आहे' म्हणत पोलिसाने तक्रारदाराकडेच मागितली लाच!


प्रातिनिधिक फोटोकारवाई न करण्यासाठी नागपूर येथील बजाजनगर पोलीस स्टेशनमधील police station पोलीस कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस शिपाई प्रफुल्ल पवार याच्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बजाजनगर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणात लाचखोरांची संख्या वाढण्याची शक्यता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वर्तविली आहे.

तक्रारदार याने बजाजनगरमधील एका अवैध सावकाराकडे १२ हजार रुपयांमध्ये मोटरसायकल गहाण ठेवली होती. तक्रारदाराने सावकाराला To the lender व्याजासह पूर्ण रक्कम परत केली. मात्र सावकार त्याला मोटरसायकल परत करीत नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वत:ची मोटरसायकल घरी आणली. त्यानंतर सावकाराने बजाजनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संर्पक साधला आणि तक्रारदाराविरुद्धच तक्रार दिली. पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्याचा विश्वासू असलेल्या प्रफुल्ल याने तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले. ‘तुझी चोरांची टोळी आहे. तू मोटरसायकल चोरी करतो, तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेन’,अशी धमकी तक्रारदाराल देण्यात आली. त्याचवेळी गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रफुल्ल याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने पडताळणी सुरू केली. त्यातून प्रफुल्ल याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

एसीबीच्या पथकाने प्रफुल्ल याला रंगेहात अटक करण्यासाठी बुधवारी सापळा रचला. तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला. चार तास तो पोलीस स्टेशनमध्ये होता. मात्र एसीबीने सापळा रचल्याची कुणकूण लागल्याने प्रफुल्ल पोलीस स्टेशनमध्ये आला नाही. त्यामुळे त्याला रंगेहात पकडता आले नाही. याप्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे. त्याच्या सांगण्यावरूनच प्रफुल्ल याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. रात्री उशिरापर्यंत प्रफुल्ल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.