Main Featured

करदात्यांसाठी पंतप्रधानांची मोठी घोषणा; फेसलेस असेसमेंट, टॅक्सपेअर चार्टर आजपासून लागू


करदात्यांसाठी पंतप्रधानांची मोठी घोषणा; फेसलेस असेसमेंट, टॅक्सपेअर चार्टर आजपासून लागू

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narednra Modi) यांनी ईमानदारीने कर भरणाऱ्यांसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे.  'ट्रान्सपरंट टॅक्सेशन-ऑनरिंग द ऑनेस्ट' (Transparent Taxation- Honoring the Honest) असे या प्लॅटफॉर्मचे नाव आहे. पंतप्रधानांनी नवीन सुधारणांची घोषणा करत असे म्हटले की, यामुळे करदात्यांना खूप फायदा होईल. अशाप्रकारे ईमानदारीने (Prime Minister's big announcement) कर भरणाऱ्या करदात्यांना पुरस्कृत करण्यासाठी आजपासून डायरेक्‍ट टॅक्‍स रिफॉर्म्‍सच्या (Direct Tax Reforms) पुढील टप्प्याची सुरुवात होत आहे. पंतप्रधानांनी अशी माहिती दिली की, फेसलेस असेसमेंट आणि टॅक्सपेअर चार्टरसारखे महत्त्वाच्या सुधारणा आजपासून लागू केल्या जाणार आहेत.

पंतप्रधान असे म्हणाले की, 'देशामध्ये सुरु (Prime Minister's big announcement)असणारी स्ट्रक्चरल रिफॉर्मची प्रक्रिया आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. एकविसाव्या शतकाच्या करप्रणालीच्या या नवीन व्यवस्थेचे आजपासून लोकार्पण केले जात आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये Faceless Assessment, Faceless Appeal आणि Taxpayers Charter  सारखे मोठे रिफॉर्म्स आहेत.  Faceless Assessment आणि Taxpayers Charter आजपासून लागू होत आहेत.'
Must Read
यावेळी पंतप्रधान असे म्हणाले की, 'गेल्या सहा वर्षांमध्ये Banking the Unbanked, Securing the Unsecured आणि Funding the Unfunded हे आमचे लक्ष्य राहिले आहे. ईमानदार करदात्यांची राष्ट्रनिर्माणात महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा करदात्यांचे जीवन सोपे होते तेव्हा तो पुढे जाऊ शकतो आणि त्यामुळे देश देखील पुढे जातो. आजपासून सुरू झालेल्या नवीन व्यवस्था देशवासियांच्या आयुष्यात सरकारची दखल कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.' विदेशी गुंतवणुकीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, 'विदेशी गुंतवणूकदारांचा(Prime Minister's big announcement) देखील भारतावरील विश्वास वाढू लागला आहे. कोरोनाच्या संकटकाळात देखील मोठ्या प्रमाणात एफडीआय (FDI) हा याचा पुरावा आहे.'

पीएम नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले की, 'भारतातील करप्रणालीमध्ये मौलिक आणि संरचनात्मक बदलाव आणणे यासाठी गरजेचे होते कारण ही प्रणाली पारतंत्र्यांच्या काळात बनलेली आहे आणि यामध्ये हळूहलू सुधारणा झाली आहे. स्वातंत्र्यानंतर यामध्ये थोडेफार बदल झाले पण अधिकतर प्रणाली तिच आहे.'