Main Featured

Oppo A53 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स




ओप्पो (Oppo) कंपनीने आपल्या A सीरिजअंतर्गत भारतात एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लाँच केला आहे. नवीन Oppo A53 स्मार्टफोन होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ग्रेडिअंट बॅकपॅनल डिझाइनसोबत येतो. Oppo A53 हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा(Oppo A53 launches in India) सेटअप, ऑक्टा-कोर प्रोसेसर, रिअर फिंगरप्रिंट सेन्सर आणि 18 W फास्ट चार्जिंगसह दमदार बॅटरी यांसारखे शानदार फीचर्स आहेत. Oppo च्या या लेटेस्ट स्मार्टफोनची रिअलमी 6, सॅमसंग गॅलेक्सी M31 आणि रेडमी नोट 9 प्रो यांसारख्या स्मार्टफोनसोबत टक्कर असेल.
Oppo A53 2020 किंमत :-
Oppo A53 स्मार्टफोन 4 जीबी आणि 6 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये आला आहे. फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 990 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 490 रुपये आहे. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लॅक, फेअरी व्हाइट आणि फॅन्सी ब्लू अशा तीन रंगांमध्ये(Oppo A53 launches in India)  उपलब्ध असेल.
Oppo A53 स्पेसिफिकेशन्स :-
Oppo A53 2020 अँड्रॉइड 10 वर आधारित कलर ओएस 7.2 वर कार्यरत आहे. यामध्ये 6.5-इंच एचडी+ (1,600×720 पिक्सल) डिस्प्ले (90 Hz रिफ्रेश रेट) आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर असून 4 जीबी व 6 जीबी रॅमचे दोन पर्याय मिळतील. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप (16MP + 2MP + 2MP) आहे. याशिवाय सेल्फीसाठी पुढील बाजूला एक 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा होल-पंच अटआउटच्या आतमध्ये सेट करण्यात आला आहे. Oppo A53 मध्ये 64 जीबी/ 128 जीबी (Oppo A53 launches in India) स्टोरेज आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी असून ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. तर, फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलं आहे.