Main Featured

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही


 भारतीय क्रिकेटचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल निवृत्ती जाहीर केली. आज त्याच्या या निर्णयावर भावूक पोस्ट येत आहेत. परंतू धोनीने निवृत्तीची एक वर्षा आधीपासूनच तयारी सुरु केली होती.भारतीय क्रिकेटचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने काल निवृत्ती जाहीर केली. आज त्याच्या या निर्णयावर भावूक पोस्ट येत आहेत. परंतू धोनीने निवृत्तीची एक वर्षा आधीपासूनच तयारी सुरु केली होती. अनेकांना धोनीने अचानक निर्णय घेतला असे वाटत आहे. परंतू तसे मुळीच नाहीय.झारखंडच्या कंपनी रजिस्ट्रीच्या कागदपत्रांवरून धोनीने 25 जानेवारी 2019 मध्ये एका मोठी तयारी सुरु केली होती. पत्नी साक्षी आणि सूरज सिंह यांना कंपनीचा संचालक बनवून एक खासगी कंपनी सुरु करण्यात आली. या कंपनीचे नाव धोनी एंटरटेनमेंट प्राइवेट लिमिटेड असे ठेवण्यात आले.महत्वाचे म्हणजे धोनीने याआधीही एक एंटरटेनमेंट कंपनी चालविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये त्याच्या क्रिकेट विश्वातील बिझनेस पार्टनर अरुण पांडे भागीदार होता. या नवीन कंपनीत अरुण पाडे नसणार आहे.

जगातील ओटीटी आणि टीव्ही कंटेंट बनविणारी मोठी कंपनी बानीजे सोबत धोनीने करार केला आहे. बानीजे इंडियासोबत धोनी या क्षेत्रात मोठे पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारसाठी धोनीच्या कंपनीने काम करण्यासही सुरुवात केली आहे.दीपक धर हे बानीजे इंडियाचे प्रमुख आहेत. धर हे एंडेमॉल शाईन नावाच्या कंपनीचे संचालक होते. या एंडेमॉलकडे भारतातील बिग बॉस सारख्या जगभरातील लोकप्रिय कार्यक्रम बनविण्याचे लायसन्स आहेत.बानीजे इंडिया आणि धोनी एंटरटेनमेंटने यानंतर काही संयुक्तीक मनोरंजनाचे कार्यक्रम बनविण्याचा निर्णय घेतला आहे.