Main Featured

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्यूशी झुंज देतोय: रितेश देशमुख


Nishikant kamat on ventilator said riteish deshmukh | Nishikant Kamat Death Rumors : निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, मृत्यूशी झुंज देतोय: रितेश देशमुख

डोंबिवली फास्ट', 'दृश्यम' फेम दिग्दर्शक निशिकांत कामत हे मृत्यूशी झुंज देतो आहे. निशिकांत कामत (Nishikant Kamat) यांचं निधन झाल्याच्या वृत्तानंतर, रितेश देशमुखने लगेचच ट्विट करून त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे आणि त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही केलं आहे.  रितेश देशमुखने  (Ritesh Deshmukh) ट्विट करत लिहिले, निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर आहे. तो मृत्यूशी झुंज देतो, त्याच्या आयुष्यासाठी  प्रार्थना करुया. असे ट्विट रितेशने काही वेळापूर्वी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. निशिकांत कामतला यांना यकृताशी संबंधित आजारामुळे त्रास आहे आणि त्यावर हैदराबादमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
Must Read 

निशिकांत कामत यांनी 'डोंबिवली फास्ट' या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट ठरला. २००६ मधील मुंबई बॉम्बस्फोटावर आधारित हिंदीतील 'मुंबई मेरी जान' या चित्रपटाचेही त्याने दिग्दर्शन केले. त्यानंतर निशिकांत कामत यांनी 'दृश्यम', 'मदारी', 'फुगे' यासारख्या चित्रपटांचे सुद्धा दिग्दर्शन केले होते. याशिवाय, 'सातच्या आत घरात', 'रॉकी हॅण्डसम', 'जुली 2', 'मदारी', 'भावेश जोशी' या सारख्या हिंदी-मराठी चित्रपटात निशिकांत कामत यांनी अभिनय केला होता. दरम्यान, अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांनी दिग्दर्शन थांबवून फक्त अभिनेता म्हणूनच काम करण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येते. तसेच, आगामी 'दरबार' या चित्रपटासाठी ते काम करत होते.