Main Featured

निर्भयाच्या आईचा सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा, म्हणाल्या 'धीर सोडू नका कारण...'
सुशांत सिंह राजपूतचं  (Sushant Singh Rajput) कुटुंब  त्यांच्या मुलाला न्याय मिळावा यासाठी कायदेशीर लढाई करत आहेत. सुशांतच पूर्ण कुटुंब सुशांत मृत्यु प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी करत आहेत. त्यांनी लोकांना जास्तीत जास्त संख्येने सुशांतसाठी सीबीआयची मागणी करावी असं देखील म्हटलं आहे. चाहत्यांसोबतंच अनेक सेलिब्रिटी त्यांना यासाठी पाठिंबा देत आहेत यात आता निर्भयाच्या आईने देखील सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा दर्शवला आहे.

 निर्भयाची आई आशा देवी यांनी सुशांतच्या कुटुंबियांना पाठिंबा दिला आहे. निर्भयाच्या आईने सांगितलं की 'सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती ज्या प्रकारे आपल्या भावासाठी न्यायाची मागणी करत आहे ते पाहून त्यांना खूप दुःख झालं आहे. त्यांना श्वेता सिंहला आश्वासन देत म्हटलं आहे की तिने विश्वास ठेवावा, सत्य नक्कीच समोर येईल आणि न्याय मिळेल. इतकंच नाही निर्भयाची आई आशा देवी यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.'
Must Read
आशा देवी यांनी सुशांतच्या वडिलांना मेसेज देत म्हटलं आहे, की त्यांनी 'धीर सोडू नये. सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवावा. संपूर्ण देश तुमच्या मुलासोबत आहे आणि तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.' सुशांतच्या मृत्युला आज दोन महिने पूर्ण झाले मात्र अद्यापही ही आत्महत्या आहे की हत्या हे तपासात कळू शकलेलं नाही. 
सुशांतची बहीण श्वेता किर्ती सिंह हिने सोशल मिडियावर भावूक व्हिडिओ शेअर करत लोकांना आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त लोकांनी तिच्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय तपासाची मागणी करावी. श्वेताने पहिल्यांदा व्हिडिओ शेअर करत ही मागणी केली होती.