Main Featured

'फुकटमध्ये पण तुझा सिनेमा पाहणार नाही', आलिया भट्ट झाली ट्रोल'सडक २' सिनेमाचा ट्रेलर पाहून ट्विटरवर लोक आपापली प्रतिक्रिया देत आहेत. काही जण ट्रेलर उत्तम असल्याची प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी अत्यंत वाह्यात ट्रेलरअसल्याचं म्हटलंय. या ट्रेलरसोबतंच अभिनेत्री आलिया भट्टला देखील सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. एकुणच या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 

एका यूजरने म्हटलंय, 'सडक २ सिनेमाच्या ट्रेलरला एका तासात दीड हजारपेक्षा जास्त लोकांची नापसंती. यावरुन काय ते समजून जावं. हा ट्रेलर युट्युबवर आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त नापसंती असलेला ट्रेलर असेल. नेपोटिझमचं पूर्ण दुकान' तर आणखी एका युजरने आलियाला ट्रोल करत म्हटलंय, 'स्वतः कमेंट सेक्शन बंद केलं आहेस. तु आमचं मत देखील जाणून घेणार नाहीस आणि आम्ही तुझा सिनेमा पाहायचा? असं कसं चालेल दीदी'. 
Must Read