Main Featured

नीट, जेईई परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी


नीट, जेईई परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी


साऱ्या देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या सुनावणीवर लागले आहे. नीट  (Neat) आणि जेईई (JEE) परीक्षांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे ठरल्या वेळेनुसारच या परीक्षा होणार की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलल्या जाणार याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.
१८ ऑगस्टच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर उद्या सुनावणी आहे. केंद्र सरकार सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यावर ठाम आहे. तर भाजपेतरशासित राज्यांनी या परीक्षांना विरोध केला आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत परीक्षांचे भवितव्य ठरणार आहे. 

Must Read


कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. कोरोना व्हायरसचे रुग्ण सापडत आहेत. कोविड- साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर जेईई, नीट च्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी  आवाहन करण्यात येत आहे. तसचे महाराष्ट्र सरकारही या परीक्षा पुढे ढकरण्याची मागणी करत आहे. मात्र, या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या आजारामुळे पुढ ढकरण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. याबाबत सर्वाच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दररम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी विद्यार्थी परीक्षा घेण्यासाठी आग्रही असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जेईई आणि नीट परीक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक झालीय. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी काँग्रेसनं उद्या राज्यव्यापी आंदोलन पुकारलंय. परीक्षांपेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा हट्ट सोडावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.