Main Featured

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जळजळीत टीकाncp jitendra awhad

अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन (Ayodhya Ram Mandir Bhumipujan) सोहळा येत्या 5 ऑगस्टला होत आहे. परंतु, या सोहळ्यावरुन भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद पेटला आहे. 'श्रीराम कोणाच्या सातबाऱ्यावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही' अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp jitendra awhad) यांनी केली आहे.

Must Readनाशिकच्या सिडको परिसरात आज एका कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते पार पडलं. विशेष म्हणजे, हे हॉस्पिटल शिवसेनेच्या पुढाकारानं तर उद्घाटन राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड (ncp jitendra awhad) यांच्या हातून झाले आहे. शहरात कोरोनाची परिस्थितीत पाहता  शिवसेनेच्या पुढाकारातून बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उदघाटन तर केलंच आणि रामजन्मभूमी भूमिपूजन कार्यक्रमावर चांगलंच तोंडसुख घेतलं.
'कोरोनमुक्त महाराष्ट्र घडो हीच श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे.  प्रभू श्रीरामाच्या (Ayodhya Ram Mandir Bhumipujan) पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा आहे. प्रभू श्रीराम हे कुणाच्या मालकीचे नाही. श्रीरामाचा सातबारा कोणाच्या खाजगी नावावर नाही, असं म्हणत  आव्हाड यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली.
तसंच, 'रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळी असते.  गेली 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं, हे अख्ख्या जगाला  माहिती आहे. राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं', असा थेट आरोपही आव्हाडांनी केला.