Main Featured

'मोदी हैं तो मुमकिन हैं'; पंतप्रधानांवर राहुल गांधी यांचे टीकास्त्र


राहुल गांधींची मोदींवर टीका

देशात झालेल्या करोनाच्या उद्रेकानंतर देशाच्या जीडीपीमध्ये (GDP) देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सर्वात मोठी पडझड होण्याची भीती इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (N. R. Narayana Murthy) यांनी व्यक्त केली. हा धागा पकडत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर, 'मोदी है तो मुमकीन है', अशी प्रतिक्रिया व्यक्त करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. (rahul gandhi criticizes pm modi saying modi hain to mumkain hain)

आर्थिक स्थितीवरून राहुल गांधी सतत मोदींना घेरत आहेत

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचे काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कंझ्युमर कॉन्फिडन्स सर्व्हेचा हवाला देत आर्थिक स्थिती आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून वाईट बातम्या येतील अशी भीती व्यक्त केली होती. सध्या लोकांमध्ये कमालीचे भय आणि असुरक्षेची भावना असल्याचेही ते म्हणाले होते. त्याच प्रमाणे लोकांच्या मनात असलेला विश्वास आज सर्वात खालच्या स्तरावर घसरला असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Must Read

देशात करोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यामुळे या वित्तीय वर्षी देशाची आर्थिक स्थिती स्वातंत्र्यानंतरची सर्वात वाईट स्थिती असेल अशी भीती इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी मंगळवारी केली होती. भारतीय अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रुळावर आणले पाहिजे असे मूर्ती म्हणाले होते. यावेळी त्यांनी डीपीतील घसरण ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण असेल असे म्हटले होते.

करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे जीडीपी कमीतकमी ५ टक्क्यांनी घसरेल असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे मू्र्ती म्हणाले. बेंगळुरू येथे आयोजित 'भारताच्या डिजिटल क्रांतीचे नेतृत्व' या विषयावरील परिसंवादात ते बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले होते.