Main Featured

मुंबई हादरली; धावत्या कारमध्ये १५ वर्षीय मुलीवर तिघांनी केला बलात्कार


मुंबई हादरली; धावत्या कारमध्ये १५ वर्षीय मुलीवर तिघांनी केला बलात्कार

१५ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Rape in a speeding car)तिघे आरोपी 'कंपनीची कार' घेऊन २९ जुलै रोजी संध्याकाळी फिरायला निघाले होते. त्यांनी १५ वर्षांच्या मुलीला कारमध्ये जबरदस्ती बसवले आणि तिला घेऊन गेले. धावत्या कारमध्येच त्या तिघांनी मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला ईस्टर्न फ्री-वेवर सोडून फरार झाले.

Must read


या घटनेने भेदरलेल्या मुलीने आपल्यावर गुदरलेला प्रसंग तिच्या काकीला सांगितला. दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. फ्री-वेवरील सीसीटीव्ही फुटेजमधील चित्रणाच्या आधारे पोलिसांनी (Rape in a speeding car)आरोपींना पकडले. या तिन्ही आरोपींविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी दोघे जण इलेक्ट्रिशियन आणि चालक आहे. तर तिसरा आरोपी हा बेरोजगार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.