Main Featured

'एमपीएससी'ने पुढे ढकलली परीक्षा


MPSC.jpg

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा 13 सप्टेंबर रोजी घेण्याचे नियोजन राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून करण्यात आले. यासंबंधी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने तीन जुलैला सूचना जाहीर केली होती. दुसरीकडे त्याच दिवशी 'आयबीपीएस'ची परीक्षा होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission) राज्यसेवा पूर्व परीक्षा घेणे अशक्‍य झाले. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय व अडचणी जाणून आयोगाने हा बदल केला आहे. राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ठळक बाबी... 
  • 'सकाळ'च्या वृत्ताची दखल घेत 'एमपीएससी'ने तिसऱ्यांदा पुढे ढकलली परीक्षा 
  • कोविडमुळे दोनदा तर आता राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेमुळे (एनईईटी) परीक्षा लांबणीवर 
  • आता रविवारी (20 सप्टेंबरला) होणार राज्यसेवेची पूर्व परीक्षा 
  • परीक्षा केंद्रांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता होणार नसल्याने आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींमुळे वेळापत्रकात बदल 

Must Read

राज्यातील कोरोनाचा संसर्ग पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 23 डिसेंबर 2019 रोजी दिलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 5 एप्रिलला घेतली जाणार होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आयोगाने त्यात पुन्हा बदल केला. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी न झाल्याने 17 जूनच्या जाहिरातीनुसार आयोगाने 13 सप्टेंबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा घेण्याचे नियोजन केले. त्यानुसार आयोगाने राज्यातील 800 परीक्षा केंद्रांवरील निर्जंतुकीकरण याचे कामही सुरू केले. मात्र, त्याच दिवशी देशपातळीवरील राष्ट्रीय पात्रता व प्रवेश प्रक्रिया असल्याने परीक्षा केंद्राची उपलब्धता पुरेशा प्रमाणात होणार नाही. विद्यार्थ्यांसह परीक्षा घेण्यास येणाऱ्या अडचणींबाबत 'सकाळ'च्या माध्यमातून आयोगाला जाणीव करुन देण्यात आली होती. तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीवरही त्यामध्ये प्रकाश टाकण्यात आला होता. आयोगाने त्या वृत्ताची दखल घेत राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आता 20 सप्टेंबर रोजी घेण्याचे जाहीर केले आहे.