Main Featured

खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडली
खासदार नवनीत राणा-कौर  (Navneet Rana ) यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह (Corona Positive ) आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. 


Must Readखासदार नवनीत राणा प्रकृती बिघडलीखासदार नवनीत राणा (Navneet Rana ) यांची प्रकृती अधिक बिघडल्याने अधिक उपचारासाठी नागरपूरला हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे.  जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.
आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट २ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास ५० ते ६० जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. सुरुवातीला रवी राणा यांच्या वडिलांनंतर आई, बहीण, भावोजी, भाचा, पुतण्या अशा एकूण सात सदस्यांना लागण झाल्याचे चाचणी अहवालात समोर आले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाही संसर्ग झाल्याचे समजले. आमदार रवी राणाही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला.  
नवनीत कौर राणा या अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर अपक्ष निवडून गेल्या आहेत.  तर त्यांचे पती आणि युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा हे बडनेरा मतदारसंघातून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत निवडून आले आहेत.