Main Featured

'शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे', मनसेची शिवसेना नेत्यांवर टीका'शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे', मनसेची शिवसेना नेत्यांवर टीका

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर मनसे अविनाश जाधव यांनी टीका केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. मात्र, शिंदे यांनी स्वतः जाधव यांना फार महत्व दिले नसले तरीही शिवसेनेच्या इतर नेत्यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. असं असताना मनसेच्या संदीप देशपांडेंनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका केली आहे. 
"चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा", अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. अविनाश जाधव यांच वक्तव्य इतक झोबंल आहे की ठाण्यातले सगळे उंदीर बाहेर पडून चू चू करत आहेत. जेव्हा इंग्रजी चॅनेल चा संपादक तुमचे रोज कपडे उतरवतो तेव्हा एकाही नेत्याची बोलायची हिम्मत नाही शेपट्या घालुन बसलेत. 
एवढं लक्षात ठेवावं चढता सुरज धीरे ढलता है ढल जायेगा, अशी टीका माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे.  शिवसेनेचे नेते जे बोलत आहेत तो सत्तेचा माज आहे. हा माज उतरवायची ताकद महाराष्ट्र मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. अविनाश जाधव यांच्यासोबत सर्व मनसे कार्यकर्ते आहेत.
Must Read


मनसे जिल्ह्याप्रमुख अविनाश जाधव यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्या नंतर मनसे आणि शिवसेना नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका टिपण्णी केली जात आहे. व्हिडिओ बाइट देऊन एका रात्रीत कुणी नेता होत नाही, अशा शब्दांत खासदार राजन विचारे यांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले. उचलून नेण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ. तुम्ही तुमच्या औकातीत राहा, असा इशाराही त्यांनी दिला.