Main Featured

कोल्हापूरात एशियन पेंट्सच्या विरोधात आंदोलन


कोल्हापूरात एशियन पेंट्सच्या विरोधात आंदोलन

एशियन पेंट्सच्या 'त्या' जाहिरातीलवरून कोल्हापुरात कंपनीविरोधात आंदोलन करण्यात आलंय. कोल्हापूरची मानहानी केल्याप्रकरणी मनसेने एशियन पेंट्सच्या बोर्डला काळ फासलं आहे. कोल्हापूरची बदनामी करणारी जाहिरात तात्काळ माग घावी अशी मागणी केली आहे. जाहिरात तात्काळ थांबवली नाही तर कोल्हापूर शहरात एकही एशियन पेंट्सच दुकान चालू देणार नसल्याचा इशारा मनसेने यावेळी दिला आहे. 
एशियन पेंटच्या जाहिरातीवर आमदार ऋतुराज पाटील  (MLA Rituraj Patil) यांनी नाराजी व्यक्त करून 'ती' जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. तसेच ऋतुराज पाटील यांनी मागणी जाहिरात मागे घेऊन संपूर्ण कोल्हापूरकरांची माफी मागण्याची मागणी केली आहे. जाहिरातीमध्ये कोल्हापूरला हिनवल्याचा प्रकार घडला असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांचे म्हणणे आहे. 

नेमकं जाहिरातीत काय आहे? 


एशियन पेंटची ही जाहिरात १९ ऑगस्ट रोजी यू ट्यूबवर अपलोड करण्यात आली. आतापर्यंत ही जाहिरात १२ लाखाहून अधिक लोकांनी पाहिली आहे. या जाहिरातीमध्ये एक लहान मुलगा आपल्या मित्रांना घरात केलेलं रंगकाम दाखवत असतो. यानंतर आपण सिंगापूरला फिरायला जाणार असल्याचं सांगतो. यावेळी तो मित्रांमध्ये भाव खात असतो. मात्र तेव्हाच त्याचे वडिल कामावरून येतात आणि त्याला आपल्याला कोल्हापूरला जायची तिकिट मिळाल्याचं सांगतात. यामुळे त्याचे वडिल त्याला चिडवायला लागतात.