Main Featured

संजय दत्तच्या आजाराबाबत समोर आली ही बाब, त्याला स्टेज 3चा कॅन्सर नाही तर...


The matter came to light regarding Sanjay Dutt's illness, if he does not have stage 3 cancer ... | संजय दत्तच्या आजाराबाबत समोर आली ही बाब, त्याला स्टेज 3चा कॅन्सर नाही तर...


बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तला या महिन्यात 8 ऑगस्टला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे संजय दत्तला (Sanjay Dutt) नियमित चेकअपसाठी दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोनाची टेस्टदेखील करण्यात आली. पण, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर इतर टेस्ट केल्या असता त्याला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याचे समोर आले.

संजय दत्तने यानंतर स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तो उपचारांसाठी कामांमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं. सुरुवातीला त्याला स्टेज 3 कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले होते. पण हॉस्पिटलमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय दत्तचा फुफ्फुसाचा कॅन्सर  (Lung cancerचौथ्या स्टेजवर पोहोचला आहे. शनिवारी ८ ऑगस्टला संजयला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यानंतर त्याने डॉक्टरांना कळवले. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे वाटत होते. घरात असणाऱ्या ऑक्सीमीटरवर त्याने शरीरातील ऑक्सिजन तपासून पाहिला. तेव्हा त्याच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी दिसले. त्यानंतर संजयला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर समजले की, त्याच्या उजव्या फुफ्फुसातून श्वास येत नाहीये. सीटी स्कॅन केले असता कळले की त्याच्या उजव्या फुफ्फुसात काही द्रव जमा झाले आहे आणि दोन्ही फुफ्फुसात जखमाही झाल्या आहेत.
Must Read

संजयला सांगण्यात आले की त्याला इन्फेक्शन झालेले असू शकतं, टीबी असू शकतो, जास्त व्यायाम केल्यामुळे दुखापत झालेली असू शकते किंवा कॅन्सर असू शकतो. त्याच्या फुफ्फुसातील पाणी काढण्यात आले. जवळपास दीड लीटर पाणी काढण्यात आले. जवळपास दोन दिवस तो रुग्णालयात होता. जेव्हा संजय दत्तला सांगण्यात आले की जे पाणी काढले ते तपासासाठी पाठवण्यात आले आहे तेव्हा त्याने अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या रिपोर्टमध्ये हे निश्चित झाले आहे की संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. यानंतर बुधवारीच मान्यता दत्तने स्टेटमेन्ट शेअर करत म्हटलं की, संजू लढाऊ आहे. तो लवकर बरा होईल आणि या काळात पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.