Main Featured

मराठा आरक्षणावर आज सुनावणी


मराठा आरक्षणावर आज सुनावणी


 मराठा आरक्षणाची नियमित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण घटनापीठाकडे वर्ग करण्याबाबतच्या अर्जांवर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी असा अर्ज राज्य सरकारने जुलै महिन्यात सुप्रीम कोर्टात केला आहे.
तसंच हीच मागणी करणारा अर्ज या प्रकरणातील इतर 9 हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनीही केला आहे. राज्य सरकारच्या आणि इतर 9 याचिकाकर्त्यांच्या या अर्जांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. 
सध्या मराठा आरक्षणाची सुनावणी ही 3 न्यायमूर्तींच्या समोर सुरु आहे. पण पूर्ण घटनापीठामध्ये 5 न्यायमूर्तींचा समावेश असतो. तसंच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या काही खटल्यांची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या पूर्ण घटनापीठासमोर सुरु आहे. त्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 10 टक्के दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण, तामिळनाडूतील आरक्षण यांचा समावेश आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची सुनावणी देखील पूर्ण घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारसह इतर याचिकाकर्त्यांची मागणी आहे.