Main Featured

धोनीच्या निवृत्तीवर सचिन आणि गांगुलीने दिली अशी प्रतिक्रियाधोनीच्या निवृत्तीवर सचिन आणि गांगुलीने दिली अशी प्रतिक्रिया
भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीच्या  Mahendra Singh Dhoni निवृतीनंतर देशासह जगातून प्रतिक्रिया येतायत. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अध्यक्ष सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर Sachin Tendulkar  यांनी देखील धोनीप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांगुलीने धोनीचे तोंडभरुन कौतूक केलंय. हा एका युगाचा अंत आहे. तो भारत आणि जगातील क्रिकेटसाठी उत्तम खेळाडू राहीला अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने बीसीसीआयतर्फे दिली. त्याची कप्तानीची क्षमता एकदम वेगळी होती. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये याची बरोबरी करणं कठीण होईल असेही तो म्हणाले. 
सुरुवातीच्या दिवसात धोनीच्या बॅटींगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रत्येक गोष्टीचा अंत आहे आणि हा शेवट गोड आहे. विकेटकिपर्स म्हणून ओळख बनवून देशाचं नाव रोशन करता येण्याचं हे मुर्तीमंत उदाहरण आहे. धोनीसारखी नेतृत्व क्षमता खूप मिळणं कठीण आहे. त्याचे करियर खूप छान होतं. त्याला खूप शुभेच्छा देतो असं बीसीसीआयतर्फे लिहिण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्वीट करुन आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. सचिनचं विश्वकप जिंकण्याचं स्वप्न धोनीच्या कॅप्टनसीमध्ये पूर्ण झालं होतं. त्यामुळे २०११ हा क्षण स्पेशल असल्याचे सचिनने म्हटलंय. 
भारतीय क्रिकेटमध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे. तुझ्यासोबत २०११ विश्वकप जिंकणं आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. तुला आणि तुझ्या परिवाराला सेकंड इनिंगसाठी शुभेच्छा ! असं ट्वीट सचिनने केलंय.