Main Featured

खासदार नवनीत राणा यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी तात्काळ मुंबईला रवाना
कोरोना संक्रमित खासदार नवनीत कौर राणा  (MP Navneet Kaur Rana) यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने व फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी तात्काळ मुंबईत हलवण्यात आले आहे. त्यांच्यावर वोकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. वोकार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना तात्काळ मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर रुग्णवाहिकाद्वारे नवनीत राणा यांच्यासह त्यांचे पती आमदार रवी राणा मुंबईला रवाना झाले आहेत.
मुंबईत लीलावती हॉस्पिटलमध्ये नवनीत राणा यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. रुग्णालयाच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा आणि यांचे पती रवी राणा नागपूरहून रुग्णवाहिकाद्वारे मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Navneet Kaur Rana leaves for Mumbai) काही दिवसांपूर्वी नवनीत राणा आणि रवी राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पत्नीची तब्येत बिघडल्याने त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची चिंता न करता त्यांच्यासोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
Must Read

दरम्यान, खासदार नवनीत कौर राणा आणि (Navneet Kaur Rana leaves for Mumbai) आमदार रवी राणा यांच्यासह राणा कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली. नवनीत राणा यांची चार वर्षाची मुलगी, मुलगा, सासरे, सासू, नणंद, नणंदेचा नवरा आणि इतर अशा 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याने रवी राणा हे त्यांना नागपूरला उपचारासाठी घेऊन गेले होते. तर त्यांच्या मुलांवर अमरावतीत उपचार सुरू असून नवनीत राणा या त्यांची देखभाल करत आहेत. मुलांची देखभाल करत असतानाच त्यांनाही ताप आणि खोकला येऊ लागला. कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने नवनीत यांनी कोरोनाची टेस्ट केली असता त्यांना लागण झाल्याचे आढळून आले. तर, दुसरीकडे आई-वडिलांसोबत नागपूरमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनाही त्रास जाणवू लागल्याने (Navneet Kaur Rana leaves for Mumbai) त्यांनीही कोरोनाची चाचणी केली. त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.