Main Featured

महाड दुर्घटना: मृतांचा आकडा वाढला,आरसीसी कन्सल्टंटला पोलीस कोठडी, बिल्डर फरार


महाड दुर्घटना: मृतांचा आकडा वाढला,आरसीसी कन्सल्टंटला पोलीस कोठडी, बिल्डर फरार


 महाड येथे पाच मजली इमारत कोसळून (Mahad Building Collapsed) झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृतांचा आकडा 16 वर पोहोचला आहे. अजूनही ढिगारा उपसण्याचं काम सुरूच आहे. अजून आठ जण बेपत्ता आहेत. बुधवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, पोलिसांनी या इमारत दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. बांधकाम व्यावसायिक फारूक काझी हा अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फारूक काझी याच्या मुलाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. वडिलांच्या लोकेशनबाबत पोलीस त्याच्याकडून  (Mahad Building Collapsed)माहिती घेत आहेत. फारूक काझी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याबरोबर आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धामणे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड पोलिसांनी बाहुबली धामणे याला नवी मुंबईतून अटक केली होती. त्याला बुधवारी माणगाव कोर्टात हजर केले असता कोर्टानं 30 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिलर खचला आणि...
तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. इमारत तयार होऊन अवघी 5 वर्षे झाली होती. मात्र, इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं होतं. इमारतीमध्ये असलेल्या बहुतांश फ्लॅटच्या भिंतीची वाळू पडत होती. महाड शहरातील काजळपुरा परीसरात ही इमारत होती. अनेक कुटुंबाचं वास्तव्य असलेली ही इमारत कोसळल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. कारण या इमारतीमध्ये 60 पेक्षा अधिक फ्लॅट होते. आतापर्यंत या दुर्घटनेत 16 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीच्या पहिला पिलर खचला तेव्हा बहुतांश तरुण इमारतीच्या बाहेर  (Mahad Building Collapsed)पडले होते. मात्र, त्यानंतर ही इमारत अक्षरश: पत्त्यांसारखी कोसळली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
महाडमध्ये कोसळलेल्या तारीक गार्डन इमारतीचे युनुस शेख व पटेल हे ठेकदार होते. या इमारतीत एकूण 40 कुटुंब राहात होते. त्यातील 25 कुटुंब बाहेर पडले. मदत कार्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनासह स्थानिक नागरिकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकला संसार...
एक एक पैसा जमवून हक्काचं घर घेतलं. मात्र, बिल्डरच्या निकृष्ट कामामुळे उभारलेला संसार डोळ्यादेखत गाडला गेला. ही करुण कहाणी आहे. तारिक गार्डन इमारतीतील वाचलेल्या कुटूंबाची. मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढलेला आपला विस्कटलेला संसार शोधण्यात आता येथील रहिवासी गुंग झाले आहेत. ढिगाऱ्यात आपली हरवलेली वस्तू मिळत आहे का, या आशेने या नागरिकांच्या नजरा सैरावैरा फिरत आहेत.

24 ऑगस्ट रोजी सायंकाळी महाड येथील काळजपुरा परिसरातील तारिक गार्डन इमारत कोसळली. 75 रहिवासी हे आपलं जीव वाचवून कसेबसे बाहेर पडले तर 17 रहिवासी हे मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. प्रशासनाने त्वरित बचावकार्य सुरू केले. 40 तासानंतर प्रशासनाला 16 मृतदेह आणि 2 जिवंत व्यक्तींना काढण्यात यश आले. त्यानंतर ढिगारा काढण्याचे काम सुरू राहिले आहे.
बचावकार्य संपल्यानंतर वाचलेल्या कुटूंबातील सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आपला बेघर झालेला संसार मातीच्या ढिगाऱ्यात शोधण्यास सुरुवात केली. राहत असलेल्या आपल्या फ्लॅटच्या जागेवर आपली घरातील महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे ढिगाऱ्याखाली शोधण्याचा (Mahad Building Collapsed) प्रयत्न करीत आहेत. एकीकडे बेघर झाल्याचे दुःख, दुसरीकडे आपलेच गेलेले बांधव याचे दुःख तर विस्कटलेला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला संसार शोधण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू झाली आहे.