Main Featured

लाँच झाले तीन नवीन ‘मेड इन इंडिया’ मोबाइलIndia smartphone

India smartphoneभारतीय स्मार्टफोन कंपनी Lava ने आपल्या #ProudlyIndian पोर्टफोलियोमध्ये तीन स्मार्टफोन आणले आहेत. कंपनीने या सीरिजमध्ये एका स्मार्टफोन आणि दोन फीचर फोन लाँच केले आहेत. Lava Z61 Pro, Lava A5 आणि Lava A9 अशी या तिन्ही फोनची अनुक्रमे नावं आहेत. 

Must Read

Lava Z61 Pro स्मार्टफोनची किंमत 5,777 रुपये आहे. हा फोन केवळ 2GB रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येते. हा फोन शॅम्पेन गोल्ड कलरमध्ये उपलब्ध असेल. तर, Lava A9 आणि Lava A5 या दोन्ही फीचर फोनच्या मागे राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. Lava A5 ची किंमत 1,333 रुपये ठेवली आहे. तर, Lava A9 ची किंमत 1,574 रुपये आहे.


India smartphone LAVA Z61 PRO स्पेसिफिकेशन्स :

या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंचाचा एचडी+ फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. ऑक्टाकोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी 8 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कॅमेऱ्यासाठी फोनमध्ये कॅमेरा पोर्ट्रेट मोड, बर्स्ट मोड, पॅनारोमा, फिल्टर्स, ब्यूटी मोड, HDR आणि नाइट मोड आहेत. अँड्रॉइड 9 ओएसवर कार्रत असलेल्या या या स्मार्टफोनमध्ये 3,100mAh क्षमतेची बॅटरी असून यामध्ये माइक्रो युएसबी पोर्ट आहे.

Lava A5 आणि Lava A9 स्पेसिफिकेशन्स :

तर, लावा A5 मध्ये 1,000mAh क्षमतेची बॅटरी आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या या फोनचा रिअर कॅमेरा 0.3 मेगापिक्सलचा आहे. या फोनची बॅटरी तीन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय, लावा A9 मध्ये 4GB रॅम आणि एफएम आहे. या फोनचा डिस्प्ले 2.8 इंच असून बॅटरी 1,700 mAh क्षमतेची आहे. याची बॅटरी सहा दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. या फोनची मेमरी माइक्रो एसडी कार्डद्वारे 32GB पर्यंत वाढवता येते. यात हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी यांसारखे फीचर्स आहेत. हे तिन्ही फोन लवकरच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध होतील, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.