Main Featured

कोल्हापुरात दुपारपर्यंत कोरोनाचे द्विशतक; हातकणंगले हॉटस्पॉटCorona new cases in kolhapur district

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा (Corona new cases in kolhapur district) कहर कायम आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान जिल्हात आज (दि.२) दुपारपर्यंत २३८ नविन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर कोल्हापूर शहरात ५० चा आकडा दुपारीच गाठला आहे. तसेच हातकणंगले तालुक्यात ही कोरोनाच्या आकडा ५० च्या पुढे गेला आहे. 


दरम्यान, सीपीआरच्या कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोग शाळेतील उपकरणात बिघाड झाल्याने तसेच जिल्ह्यात अँटीजेन टेस्ट किटच्या तुटवड्याने स्वॅब तपासणी संथ गतीने सुरु होती. त्याला आजपासून वेग आल्याने जिल्ह्यातील आकडा दुपारीच २५० च्या जवळपास गेला आहे. 


Must ReadCorona new cases in kolhapur districtजिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात ५६, पन्हाळा तालुका २४, करवीर तालुका २८, राधानगरी तालुका १९, गडहिंग्लज तालुका 2, कागल तालुका २७, भुदरगड तालुका १४, शिरोळ तालुका १८, कोल्हापूर शहर परिसर ५०, अशी आतापर्यंत तालुका निहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे.