Main Featured

गांधीनगर परिसरात 468 कोरोना पॉझिटिव्ह


Kolhapur- गांधीनगर परिसरातील सहा गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह (corona positive)रुग्णांची संख्या बुधवारी आठने वाढली. त्यामुळे गांधीनगर परिसरामध्ये एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 468 वर पोहोचली आहे.


बुधवारी उचगाव व वळीवडे येथे  प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले. चिंचवाड व गडमुडशिंगी येथे प्रत्येकी एक रुग्ण मिळाला. गांधीनगर व वसगडे येथील रुग्णसंख्या स्थिर राहिली. 

गांधीनगर  परिसरातील गाववार कोरोना रुग्णांची बुधवार अखेरची संख्या अशी ः गांधीनगर  (160), वळीवडे (92), उचगाव (152), गडमुडशिंगी (42), चिंचवाड (28), वसगडे (5). याप्रमाणे गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) रुग्णांची संख्या 468 वर पोहोचली आहे. 

Must Read