Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह

Kolhapur

Kolhapur जिल्ह्यात कोरोना काळात युद्धपातळीवर काम करणार्‍या शासकीय कर्मचारी व अधिकार्‍यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बुधवारी माजी आमदार महादेवराव महाडिक, भुदरगडचे प्रांताधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण समन्वय अधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह (corona positive)आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.


दिवसभरात कोरोनामुळे आणखी 16 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 614 झाली आहे. दिवसभरात 679 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्युमळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 876 झाली आहे. 

Must Readशहरातील प्रमुख बाजारपेठांतील 15 व्यापार्‍यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने व्यापारपेठांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील कपिलतीर्थ मार्केट व लक्ष्मीपुरी येथील काही व्यापार्‍यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढत असतानाच व्यापार्‍यांनाही कोरोना (coronavirus)बाधा झाल्याने व्यापारीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. Kolhapur शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणच्या 200 हून अधिक व्यापार्‍यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. जे स्वॅब घेतले यापैकी 15 हून अधिक व्यापार्‍यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे  महापालिका प्रशासनही सतर्क झाले असून, नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.