Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर उतरला, पंचगंगेच्या पातळीत घटकोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला असून, पंचगंगेच्या 43 फूट धोका पातळीतही संथगतीने घट होऊ (Kolhapur rain update) लागली आहे. गेल्या दोन दिवसांत ही पातळी चार फुटांने कमी झाली असून, दुपारी एक वाजता 40.6 फुट झाली होती. सध्या पंचगंगा नदी 39 फुट इशारा पातळीवरुन वाहत आहे.
दरम्यान आज दुपारी सव्वा बारानंतर राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून 4 हजार 256 क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर जिल्ह्यात 47 बंधारे अजुनही पाण्याखाली होते. जिल्ह्यात काल (Kolhapur rain update)दिवसभरात तुरळक पावसाने हजेरी लावली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 40 मिमी पावसाची नोंद झाली.
राधानगरीतून 4 हजार 256 तर अलमट्टीतून 1 लाख 20 हजार क्युसेक विसर्ग

MUST READराधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने, दोन-चार दिवसांपूर्वी चार स्वयंचलित दरवाजे ठराविक अंतराने एकापाठोपाठ उघडले होते.पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हे दरवाजे काल सकाळ पर्यंत बंद झाले होते. पण धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात राहिल्याने, आज दुपारी 12.15 वाजता सहावा आणि पाच मिनिटा च्या अंतराने तिसरा दरवाजा उघडला.यावेळी(Kolhapur rain update) धरणातुन एकूण विसर्ग 4 हजार 256 क्युसेकने सुरू होता. दरम्यान कोयना धरणात 74.30 टीएमसी तर कर्नाटकातील अल्लमट्टी धरणात 92.593 टीएमसी इतका पाणीसाठा होता.तर अलमट्टी धरणातून 1 लाख 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.