Main Featured

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर


Kolhapur जिल्ह्यातील कोरोनाचा कहर (coronavirus) काही केल्या थांबत नाही. आज दिवसभरात आतापर्यंतची सर्वाधिक 29 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 643 झाली आहे. चोवीस तासांत 771 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 21 हजार 639 झाली आहे. मृतांत शहरातील 13 जणांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील 373 जण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 277 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सकाळी 10 वाजता 10 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. शहरातील 6, हातकणंगले 2, करवीर, कागलमधील प्रत्येकी एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. 10.15 वाजता आणखी 13 बाधितांचे अहवाल आले. यात करवीर 8, हातकणंगले 3, राधानगरी व करवीर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 11.15 वाजता आणखी 32 बाधित आढळून आले, त्यात शहर 3, करवीर 5, हातकणंगले 1, तर कागल तालुक्यात 23 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 11.30 च्या सुमारास पुन्हा 31 कोरोनाबाधित आढळले असून, यात कागल 23, तर भुदरगडमधील 8 जणांचा समावेश आहे. 12.15 वाजता 27 नवीन बाधितांचे अहवाल आले. यात हातकणंगले तालुक्यातील 26 व शिरोळमधील 1 रुग्ण आहे. 12.30 वाजता पुन्हा 27 नव्या रुग्णांची भर पडली. यात हातकणंगले 21, तर शिरोळमध्ये 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पुन्हा 12.30 वाजता 27 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. यात शिरोळ व करवीर प्रत्येकी 6, हातकणंगले व पन्हाळा प्रत्येकी 3, तर शहरातील 6 जणांचा समावेश आहे.

Must Read


1) शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफुस सुरू 2) मलाही आत्महत्या करावीशी वाटते,मग त्याला जबाबदार कोण असेल ? 3) अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार का? सुप्रीम कोर्टात आज निकाल 4) तुकाराम मुंढे यांचा धक्कादायक आरोप 5) PHOTOS: मराठमोळी अभिनेत्री तृप्ती तोरडमलच्या ट्रेडिशनल लूकमधील बोल्ड अदा पाहून हटणार नाही तुमची नजर

दरम्यान, सायंकाळी 6.15 वाजता आणखी 33 कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. यात शहर 26, करवीर 5, तर कागल, हातकणंगलेमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी सात वाजता 29 नवे कोरोनाबाधित आढळले असून, शिरोळमधील 28 व कागल येथील एकाचा समावेश आहे. 7.15 वाजता 34 जण बाधित आढळले, यात करवीर 14, शहर 6, हातकणंगले 5, पन्हाळा 3, राधानगरी 1, आजरा 1, जिल्ह्याबाहेरील एकाजणाचा समावेश आहे. 7.30 वाजता 16 बाधितांची भर पडली. यात हातकणंगले 13, शिरोळ मधील 3 रुग्णांचा समावेश आहे.


दिवसभरात kolhapur जिल्ह्यात 1 हजार 848 जणांची कोरोनाची प्राथिमक तपासणी झाली. त्यापैकी 1 हजार 703 आरटी-पीसीआरसाठी, तर 540 जणांचे स्वॅब अँटिजेन तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून, वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्र हडबडले आहे. 

कोरोनाबाधित रुग्णसंख्या (coronavirus) वाढू लागल्याने गंभीर रुग्णांना रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवून घेतले जात आहे. तर ज्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे; मात्र त्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशांना घरीच उपचार दिले जात आहेत. त्यांच्यावरदेखील दक्षता समिती आणि वैद्यकीय पथके लक्ष ठेवून आहेत.