Main Featured

कोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्ण


In Kolhapur, 13 people died due to corona infection and 560 new patients | कोल्हापुरात कोरोना संसर्गामुळे १३ जणांचे मृत्यू तर ५६० नवे रुग्ण

 पुणे, मुंबई पाठोपाठ हॉटस्पॉट बनसलेल्या(Kolhapur Corona Hotspot)कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संसर्गामुळे १३ जणांचा मृत्यू झाला, तर नवीन ५६० रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १२ हजार ८३८ वर जाऊन पोहचली असून मृतांची संख्याही जवळपास ३६४ वर गेली आहे. त्यामुळे आता रुग्णांवर थेट त्यांच्या घरातच उपचार केले जात आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात रुग्ण वाढीचा वेग अतिशय मोठा आहे. दि. १ जुलैपासून संसर्ग फैलावला आहे. रुग्ण वाढीचा वेग काही केल्या कमी होत नाही. रोज ४०० ते ५०० च्या पटीत रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. त्याचा परिणाम मात्र आरोग्य यंत्रणेवर झाला असून उपचार प्रक्रियेत विस्कळितपण आला आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन चांगले काम करत असतानाही रुग्ण वाढ थांबतKolhapur Corona Hotspot) नसल्याचे त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत.
Must Read

आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३५४ रुग्ण Kolhapur Corona Hotspot)दगावले असून त्यामध्ये कोल्हापूर, इचलकरंजी या शहरासह हातकणंगले तालुक्यातील रुग्णांचा त्यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. निमोनिया, मधुमेह, श्वसनाचे विकास असलेले कोरोना बाधित रुग्ण मयत होण्याचे प्रमाण जादा आहे. आरोग्य प्रशासनाने मृत्यू दर कमी करण्याचे प्रयत्न चालविले असले तरी त्यात त्यांना फारसे यश आलेले नाही.