Main Featured

चाकरमान्यांसाठी खूषखबर! कोकण रेल्वे सोडणार 162 विशेष ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी रेल्वेने एक खुषखबर दिली आहे. रेल्वेने गणेशक्तांसाठी गणेशोत्सवाच्या(Good news by train for Ganesha devotees) काळात तब्बल 162 विशेष एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक व सावंतवाडी, कुडाळ, रत्नागिरी वरून सोडण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टपासून या विशेष गाड्यांसाठी बुकिंग सुरु होणार आहे. कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवशांनाच या ट्रेन मधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
Must Read
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ
कोकणात गणेशोत्सवासाठी(Good news by train for Ganesha devotees)जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस टोलमधून सवलत मिळणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.