Main Featured

सैफ-करिनाकडे पुन्हा 'गुड न्युज', अधिकृतरित्या केलं जाहीर
करिना कपूर आणि सैफ अली खान (Kareena Kapoor and Saif Ali Khan) त्यांच्या सिनेमांसोबतंच आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असतात ते म्हणजे त्यांचा मुलगा  तैमुर. जेव्हा पासून तैमुरचा जन्म झाला आहे तेव्हापासून त्याच्या फोटोंचा इंटरनेटवर धुमाकुळ दिसून  आला आहे. करिना-सैफ आणि तैमुरच्या चाहत्यांसाठी अत्यंत गोड बातमी आहे. करिना आता दुस-यांदा आई होणार आहे. करिनाचे चाहते देखील करिनाच्या या गुड न्युजची कधीपासून वाट पाहत होते. तैमुर नंतर अनेकदा ती प्रेग्नंट असल्याच्या अफवा पसरत होत्या मात्र आता या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 
करिना कपूर खान आणि सैफ आली खान यांनी ही गोष्ट अधिकृतरित्या सगळ्यांना सांगितली आहे. दोघांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं आहे. या स्टेटमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय, 'आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आता नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे. आमच्या सगळ्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेम आणि सहकार्यासाठी त्यांचे आभार.'
Must Read

करिनाने याआधी एका चॅट शोमध्ये सांगितलं होतं की तिला आणि सैफला त्यांचं कुटुंब वाढवायचं आहे. तिने हे देखील सांगितलं होतं की कदाचित दोन वर्षांनतर ते दुस-या मुलाबाबत विचार करतील. जेव्हा करिना पहिल्यावेळी प्रेग्नंट होती तेव्हा सोशल मिडियावर तिची खूप चर्चा होती. तिच्या बेबी बंपसोबतचे तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे करिना सैफ आणि मुलगा तैमुरसोबतंच घरातंच वेळ घालवत आहे. तिचे अपडेट्स ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर शेअर करत असते.