Main Featured

संधी मिळाली नाही; मुंबईच्या क्रिकेटपटूने केली आत्महत्या


क्रिकेटक्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करन तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये करनला ज्युनिअर डेल स्टेन असे म्हटले जात होते. करनची गोलंदाजी करण्याची अॅक्शन आणि उंची दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेल स्टेन सारखी होती.
सोमवारी जेव्हा कुटुंबीयांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा करनने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे दहा वाजता गोकुळधाम कोनू कपाउंडमध्ये करनने आत्महत्या केली. पोलिसांना करनच्या बेडरुममधून सुसाइट नोट सापडली आहे. या घटनेची नोंद कुरार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

करन सोबत त्याची आई आणि भाऊ राहत होता. त्याच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार संधी मिळत नसल्याने करन गेल्या काही दिवसांपासून निराश होता. करनने आत्महत्या करण्याआधी राजस्थानमधील एका मित्राला फोन केला होता. आपल्याला संधी मिळत नसल्याबद्दल निराश असल्याचे त्याला सांगितले होते. तसेच मी आयुष्य संपवण्याचा विचार करत असल्याचे करनने मित्राला सांगितले होते.
करनचा फोन झाल्यानंतर संबंधित मित्राने करनच्या बहिणीला फोन करून याची माहिती दिली. करनची बहिण देखील राजस्थानमध्ये राहते. मित्राच्या फोननंतर करनच्या बहिणीने मुंबईत आईला फोन करून सांगितले. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता.
रात्रीचे जेवण झाल्यानंतर १०.३०च्या सुमारास करन त्याच्या बेडरूममध्ये गेले आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला.