Main Featured

Jio युजर्ससाठी गुड न्यूज, Free मध्ये पाहता येणार IPL 2020


देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनीच्या ग्राहकांना इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2020) ऑनलाइन स्ट्रीमिंग मोफत पाहता येणार आहे. कंपनीच्या काही निवडक प्लॅन्सवर फ्री आयपीएल अ‍ॅक्सेस देण्यात येणार आहे.स्टार इंडिया आणि जिओ यांच्यात एक झाला असल्याचं 91 मोबाइल्सच्या एका रिपोर्टमध्ये महटलं आहे. या रिपोर्टनुसार, कराराअंतर्गत जिओ युजर्सना IPL 2020 चा फ्री अ‍ॅक्सेस मिळेल. काही निवडक प्लॅन्सवर जिओकडून ही ऑफर मिळेल. यासाठी जिओकडून 401 आणि 2,599 रुपयांचे दोन रिचार्ज प्लॅन जारी केले जाणार आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये मोफत IPL 2020 ची लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल. हे दोन्ही प्लॅन्स कंपनीकडे आधीपासूनच उपलब्ध आहेत. पण यामध्ये आयपीएलचा अ‍ॅक्सेस मिळेल की नाही याबाबत अद्याप कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. याशिवाय जिओ फायबरच्या काही निवडक प्लॅनमध्येही आयपीएल पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच, ज्या युजर्सकडे डिज्नी+ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन किंवा फ्री अ‍ॅक्सेस नसेल. त्यांना केवळ 5 मिनिटांपर्यंत आयपीएल 2020 लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. जिओ फायबरच्या 849 रुपये आणि त्यावरील प्लॅनमध्ये IPL 2020 लाइव्ह पाहता येईल. कारण, या प्लॅनमध्ये डिज्नी प्लस हॉट्स्टार व्हीआयपी वार्षिक सब्सक्रिप्शन फ्री मिळते.
जाणून घेऊया 401 आणि 2,599 रुपयांच्या प्लॅनबाबत –
401 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. 28 दिवसांच्या वैधतेसह 6 जीबी एक्स्ट्रा डेटाही या प्लॅनमध्ये मिळतो. याशिवाय जिओ नेटवर्क्ससाठी फ्री कॉलिंग तर अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिटे मिळतात. दुसरीकडे, 2,599 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये रोज 2 जीबी डेटा मिळतो. विशेष म्हणजे यात 10 जीबी एक्स्ट्रा डेटाही वापरण्यास मिळतो. म्हणजे एकूण 740 जीबी डेटा यामध्ये मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ फ्री कॉलिंग , दररोज 100 फ्री एसएमएस आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12 हजार मिनिटे मिळतात.