Main Featured

रिलायन्स जिओ फोन २ साठी विशेष ऑफर


jio phone


रिलायन्स जिओने देशात जन्माष्टमीनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. रिलायन्स जिओ फोन २ साठी विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे. जिओ फोन २ ची वाट पाहणारे हा फोन अवघ्या १४१ रुपयात घेऊ शकतात. या फोनसंदर्भात जिओच्या वतीने एक खास ऑफर देण्यात आली आहे.

जिओ फोनवर ईएमआयचा पर्याय देण्यात आला असून १४१ रुपयाच्या ईएमआयवर ग्राहक हा फोन विकत घेऊ शकतात. जिओच्या नवीन फोनमध्ये गुगल मॅप्स आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. या 4G फोनची एकूण किंमत २,९९९ रुपये आहे. फोनमध्ये 4GB इंटर्नल स्टोरेज आणि 512MB रॅम देण्यात आला आहे. शिवाय मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनमधील स्टोरेज क्षमता 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये 2MP चा रीअर कॅमेरा आणि फ्रंट कॅमेरा VGA देण्यात आला आहे. फोनमध्ये 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Must Read

या फोनवर जन्माष्टमीच्या निमित्त कंपनीने खास ऑफर म्हणून दिली आहे. याअंतर्गत आपण केवळ १४१ रुपयांच्या ईएमआयवर फोन विकत घेऊ शकता. फोनची एकूण किंमत २,९९९ रुपये आहे. फोनमध्ये बरीच वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन KaiOS ऑपरेटींग सिस्टम देण्यात आली आहे. व्हिडिओ कॉलिंग, यूट्यूब सर्फिंग, सोशल मीडियाचा वापर करता येणार आहे.