Main Featured

दोन दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं काश्मीर, 24 तासांमध्ये सुरक्षा दलांना केलं टार्गेट


दोन दहशतवादी हल्ल्यांनी हादरलं काश्मीर, 24 तासांमध्ये सुरक्षा दलांना केलं टार्गेट
जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) च्या कुलगाम (Kulgam)  जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केंद्रीय राखिव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force)  बंकरवर हल्ला केला. कुलगाम जिल्ह्याच्या नेहामा Nehama CRPF Campच्या बाहेर हा हल्ला करण्यात आला. त्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झालाय.
सोमवारी दिवसभरातला हा दुसरा हल्ला होता. सुरक्षा दलांनी सर्व परिसराला घेरलं आहे. सर्च ऑपरेशन सुरु असून दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाईचे संकेत सुरक्षा दलांनी दिले आहेत. सकाळी बारामूल्ला (Baramulla) इथं पेट्रोलिंग करणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात एक पोलीस अधिकारी तर CRPFचे दोन जवान शहीद झाले होते.
गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांचे सातत्याने हल्ले होत असून त्यात त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात कडक बंदोबस्त होता.गेल्या काही महिन्यांपासून तर लॉकडाऊन आहे. मात्र असं असतांनाही दहशतवाद्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षा दलांनी आता विशेष महिम सुरु केली असून दहशतवाद्यांना रोखण्यासाठी ास उपाय केले जात आहेत.