Main Featured

BREAKING: पुलवामामध्ये चकमक: एका जवानाला वीरमरण तर अतिरेक्याचा खात्मा


BREAKING: पुलवामामध्ये चकमक: एका जवानाला वीरमरण तर अतिरेक्याचा खात्मा जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर, चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याची बातमी येत आहे.
असे सांगितले जात आहे की, या चकमकीदरम्यान एक जवान गंभीर जखमी झाला होता त्यांना तातडीने श्रीनगरच्या 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान हा जवान शहीद झाला. याशिवाय आणखी एक तरुण जखमी झाल्याची बातमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी
यापूर्वी, पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेत (LOC) ओलांडून घुसखोरी करत असलेल्या एका अतिरेक्याला सैन्यानं ठार केले होते. त्यासोबतच दोन अतिरेकी जखमीही झाले होते. घटनास्थळावरून एके-47 असॉल्ट रायफल, दोन एके-47 मॅगजिन आणि काही खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांनी याबाबत सांगितले की, “अतिरेक्यांच्या एका गटाने कृष्णघाटी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण दक्ष भारतीय सैनिकांनी त्यांना नियंत्रण रेषेच्या जवळच ठार केले”. दरम्यान, घुसखोरी रोखताना एक अतिरेकी ठार झाला आणि दोन गंभीर जखमी झाले.