Main Featured

अब तक 600! वॉर्न, मुरलीधरन, कुंबळेच्या पंक्तीत अँडरसनची एन्ट्री, ठरला पहिला वेगवान गोलंदाजइंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने मंगळवारी इतिहास रचला. 38 वर्षीय अँडरसन याने कसोटीत 600 बळींचा टप्पा गाठला आणि शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, अनिल कुंबळे यांच्या पंक्तीत स्थान मिळवले. तसेच कसोटीत हा मैलाचा दगड गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज देठीक ठरला.
इंग्लंड आणि पाकिस्तान संघात झालेल्या साउथहॅप्टन मैदानावर जेम्स अँडरसन याने कसोटीत 600 बळींचा ऐतिहासिक टप्पा गाठला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या कसोटीचा पाचव्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार अजहर अली (31) याचा बळी घेताच अँडरसनने ही कामगिरी नोंदवली. अँडरसनने (Became the first fast bowler)156 गया कसोटीत या विक्रमाची नोंद केली. ही कसोटी सुरू होण्यापूर्वी त्याच्या खात्यात 593 बळींची नोंद होती. पहिल्या डावात 56 धावा देऊन त्याने 5 बळी घेतले आणि त्याच्या बळींची संख्या 598 झाली.
चौथ्या दिवशी फॉलोऑन घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा एक बळी टिपत बळींचा आकडा 599 वर गेला. मंगळवारी पहिले दोन सत्र पावसाने वाया गेल्याने अँडरसन 600 बळींचा टप्पा गाठतो की नाही हा प्रश्न होता. मात्र अखेरच्या सत्रात पाऊस थांबल्याने खेळ सुरू झाला आणि त्याने अजहर (Became the first fast bowler)अली याला रूटकरवी बाद करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

कसोटीत सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) – 133 कसोटीत 800 बळी
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) – 145 कसोटीत 708 बळी
3. अनिल कुंबळे (हिंदुस्थान) – 132 कसोटीत 619 बळी
4. जेम्स अँडरसन (इंग्लंड) – 156 कसोटीत 600* बळी
5. ग्लेन मेग्राथ (ऑस्ट्रेलिया) – 124 कसोटीत 563 बळी