Main Featured

आयपीएलचे वेळापत्रक झालं व्हायरल, पाहा सलामीचा सामना कोणामध्ये रंगणार


आयपीएल २०२०चे वेळापत्रक व्हायरल
यावर्षीचे आयपीएल( Indian Premier League) पाहण्यासाठी जगभरातील चाहते उत्सुक झालेले आहेत. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना कोणत्या संघांमध्ये रंगणा, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. आयपीएलचे वेळापत्रक अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले नसले तरी ते व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना नेमका कोणत्या संघांचा असेल, ते पाहा...
यावर्षी आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले आहे. पण आतापर्यंत युएईमध्ये एकही आयपीएलमधील संघ पोहोचू शकलेला नाही. सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार असून त्यानंतर त्यांना युएईला पाठवण्यात येणार ( Indian Premier League) आहे. यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीमध्ये रंगणार आहे. यावेळी आयपीएलचे सामने दुबई, आबुधाबी आणि शारजा या तीन ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.
गेल्यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली होती. गेल्यावर्षी मुंबई इंडियन्सनेच जेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी पहिला सामना खेळण्याचा मान त्यांचाच असेल. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये होईल, असे म्हटले जात आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरु होणार आहे. बीसीसीआयने अद्याप यावर्षीच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. पण सोशल मीडियावर हे वेळापत्रक चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे वेळापत्रक खरं की खोटं, हे बीसीसीआयने अधिकृतरीत्या वेळापत्रक जाहीर केल्यावरच कळू शकणार आहे. या व्हायरल झालेल्या वेळापत्रकाची कोणताही जबाबदारी महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम घेत नाही. जे काही व्हायरल झाले आहे ते तुमच्यापुढे फक्त ठेवण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला रामदेव बाबा आयपीएलच्या प्रायोजकत्वाच्या शर्यतीत आहेत, पण त्यांचे यापूर्वी आयपीएलबाबतचे मत चांगले नव्हते. यापूर्वी आयपीएलबाबत रामदेव बाबा म्हणाले होते की, " चीअरलीडर्समुळे क्रिकेट हा खेळ अश्लील ( Indian Premier League) झाला आहे. हे भारताच्या संस्कृतीच्या विरोधात आहे. आयपीएल हा एक मोठा जुगार आहे, त्याचबरोबर आयपीएलमुळे सट्टेबाजी वाढत असल्याचेही पाहायला मिळत आहे. "
Must Read
पतंलजीला जर आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवायचे असेल तर त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाचा वाटा असू शकतो, असे म्हटले जात आहे. करोनाच्या काळात मोदी यांनी एक घोषणा केली होती. ही घोषणा जर लक्षपूर्वक ऐकली तर पतंजलीला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळू शकते, असे म्हटले जात आहे. करोनाच्या काळात ( Indian Premier League) मोदी यांनी आत्मनिर्भर भारत, अशी एक घोषणा केली होती. या घोषणेनुसार पतंजली ही भारतातील कंपनी असून तिला आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवणे सोपे होईल, असे म्हटले जात आहे.