Main Featured

आता IPL 2020 मध्ये खेळणार 'आदित्य ठाकरे', विराटनं आपल्या संघात केलं सामिल


आता IPL 2020 मध्ये खेळणार 'आदित्य ठाकरे', विराटनं आपल्या संघात केलं सामिल
कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2020 ही स्पर्धा आता 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयनं यंदा ही स्पर्धा भारतात आयोजित न करता युएइमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या (IPL) तेराव्या हंगामासाठी उत्सुक आहे. यासाठी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघानं नव्या दमाच्या खेळाडूंना संघात जागा दिली आहे. यातच RCBने विदर्भाचा जलद गोलंदाज आदित्य ठाकरेला (Aditya Thakare) संघात स्थान दिले आहे.
कोरोनामुळे यंदा आयपीएलसाठी नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व संघ जास्तीत जास्त राखीव खेळाडू सामील करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेत ही गरज ओळखून RCBने जलद गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.
आदित्य ठाकरे हा विदर्भाचा खेळाडू असून, गेल्या काही वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर 2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे आदित्यसाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले आहेत.

12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट सज्ज
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बंगळुरू संघानं आतापर्यंत तीनवेळा फायनलपर्यंत मजल मारली आहे. मात्र त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळाले नाही आहे. दरम्यान, आयपीएलच्या 13व्या हंगामाला आता सुरुवात होणार असून विराट 12 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज आहे. विराटनं ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात तो RCBच्या खेळाडूंसोबत मस्ती करताना दिसत आहे.