Main Featured

या योजनेंतर्गत 1 रुपया महिन्यात मिळतो 2 लाखांचा विमा


सरकारद्वारे सर्वसामान्यांसाठी अनेक विमा योजना चालवल्या जात आहेत. यापैकीच एक पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही आहे. या योजनेंतर्गत केवळ 1 रुपये महिन्याला भरून 2 लाखांपर्यंतचा डेथ इंश्योरेंस (insurance)मिळतो. योजनेंतर्गत दर महिन्याला 1 रुपये असे वर्षाला 12 रुपये प्रिमियमध्ये अनेक कव्हर भेटतात. ही रक्कम तुमच्या लिंक्ड बँक खात्यातून वजा होते.या योजनेंतर्गत दुर्घटनेत मृत्यू झाल्यास नॉमिनीला 2 लाख रुपये मिळतात. दुर्घटनेमुळे दिव्यांग झाल्यावर देखील 2 लाख रुपये मिळतात. दुर्घटनेमुळे स्थायी आंशिक दिव्यांग झाल्यास 1 लाख रुपये मिळतात. पंतप्रधान सुरक्षा विमा (pradhan mantri suraksha bima yojana)योजनेचा फॉर्म तुम्ही ऑनलाईन अथवा बँकेत जाऊन भरू शकता. कोणत्याही बँकेद्वारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेसाठी व्यक्तीचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. योजनेंसंदर्भातील फॉर्म http://www.dif.mp.gov.in/pmjsby.htm या वेबसाईटवरून डाऊनलोड करून बँकेत जमा करता येतो. हा फॉर्म मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Must Read

बँक दरवर्षी 1 जूनला तुमच्या खात्यातून विम्याचा (insurance) हफ्ता वजा करेल. यासाठी विमा घेणाऱ्याचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 70 वर्ष असणे गरजेचे आहे.या विमा योजनेचा (pradhan mantri suraksha bima yojana) लाभ देशभरातील 14 कोटी लोक घेत असून, दर महिन्याला 1.5 लाख लोक या योजनेत सहभागी होत आहेत.