Main Featured

इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या बॉयफ्रेंडने केली आत्महत्या, गायिका ICU मध्ये


इंडियन आयडल फेम रेणू नागरच्या बॉयफ्रेंडने केली आत्महत्या, गायिका ICU मध्ये

राजस्थानमधील अलवर या शहरातून पुढे आलेली गायिका रेणू नागरच्या (Renu Nagar) बॉयफ्रेंडने आत्महत्या केली आहे. विषारी पदार्थ खाल्ल्याने तिचा बॉयफ्रेंड रवी नट याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला आहे. त्या मृत्यूची बातमी ऐकताच रेणू बेशुद्ध झाली असून तिला मित्तल रुग्णालयामध्ये(Renu Nagar's boyfriend commits suicide) दाखल करण्यात आले आहे. सध्या रेणूची परिस्थिती अत्यंत खराब आहे, तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. उशिरा रात्री तिचा बॉयफ्रेंड रवी नटला विषारी पदार्थ खाल्लेल्या अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
जवळपास महिनाभरापूर्वी रवी नट आणि रेणू नागर या प्रेमीयुगुलाने घरातून पलायन केले होते. रेणूच्या वडिलांनी त्याच्या विरोधात मुलीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. 5 दिवसांपूर्वीच ते परतले होते. पोलिसांकडे गायिकेचा जबाब नोंदवून झाल्यावर रवी नटला सोडण्यात आले होते.

Must Read

गेल्या रात्री त्याने विषारी पदार्थाचे सेवन केले, त्याची तब्येत बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयामध्ये भरती केले, (Renu Nagar's boyfriend commits suicide) मात्र 11.15 मिनिटांनी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याने विषारी पदार्थाचे सेवन का केले याबाबत त्याच्या वडिलांनी काही माहित नसल्याचे सांगितले आहे. याप्रकणी एनईबी पोलिसांंनी नगर पोलिसांना सूचित केले आहे. आज तक ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
रवी नट भरतपूर जिल्ह्यातील नगर कस्बे याठिकाणचा रहिवासी होता, अलवरमध्ये तो भाड्याच्या घरामध्ये राहत होता. सध्या तो त्याच्या नगर या गावीच होता